रत्नागिरी : पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष (कै.) चंद्रकांत हरिश्चंद्र प्रभू यांचे निधन झाले. त्यांना पोमेंडी खुर्द (काजरघाटी) रामेश्वरवाड, कुवारबाव येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा सोमवारी (ता. २३) दुपारी ३ वाजता श्री महालक्ष्मी देवस्थान येथे आयोजित केली आहे. या सभेकरिता ग्रामस्थ बंधू-भगिनी, देवस्थान कार्यकारिणी समिती सदस्य, उत्सव कमिटी सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे