कोकणातील मिल कामगारांना मिळणार हक्काच घर ; माजी आ. प्रमोद जठार यांचे आश्वासन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हातील मिल कामगारांना शासनाकडून घरं मिळण्याकरिता रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख (भाजपा) माजी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे समस्या मांडण्यात आला होत्या. त्याबाबत प्रमोद जठार यांनी मी देखील एक मिल कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे आपल्या समस्या मी आमदार सुनिल राणे (अध्यक्ष गिरणीकामगार शासन समिती ) यांच्याकडे पत्राव्दारे मांडतो आणि आपल्या सर्वांना हक्काच घर लवकरात लवकर मिळावे हि मागणी करतो, असे आश्वासन दिले होते.

 

कुडाळ येथील एमआयडीसी शासकीय विश्रामगृहात गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी रश्मी ताई लुडबे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार तथा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार उपस्थित होते. या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीत असणारे प्रश्न अपूर्ण कागदपत्र तासेच शासकीयबाबतीत येणाऱ्या अडचणी या शासन दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन श्री. जठार यांनी यावेळी दिले.

 

गिरणी कामगारांचे सुपुत्र असलेले प्रमोद जठार यांनी या प्रश्नावर तोडगा काढून गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून घरे मिळवून देणार असे, आश्वासन दिले. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार गिरणी कामगार शासन समिती अध्यक्ष आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येर्हे बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे आता कुठेतरी सर्वसामान्य मिल कामगारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.