मेर्वी-गुरववाडी येथे घरफोडी; बंद घर फोडून रोख रक्कमेसह चादींच्या वस्तूंची चोरी

crime CHOR

रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील मेर्वी-गुरववाडी येथील बंद घर फोडून अज्ञाताने रोख रक्कम चादींच्या वस्तू असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना शनिवार 8 जून रोजी सायंकाळी 6.30 ते रविवार 9 जून रोजी सकाळी 7.30 वा. कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे काका वामन सुतार काही कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलुप कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या बेडरुममधील लोखंडी आणि लाकडी कपाटाचे लॉकर उघडून रोख 44 हजार 400 रुपये आणि 1 हजार 500 रुपयांचा चांदीच्या दोन छोट्या समया असा एकूण 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 454,457,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.