राजापूर | प्रतिनिधी : शहरातील बाग काझी येथील रहिवाशी श्रीमती कुलसुंबी ईस्माइल काझी (९२) यांचे रविवारी वृध्दापकालाने निधन झाले. राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष लियाकत काझी यांच्या त्या मातोश्री होत.
वृध्दापकालामुळे गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र शनिवारी मध्यरात्री त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली.
एक शांत, संयमी आणि परोपकारी व्यक्तीमत्व म्हणून त्या बाग काझी परिसरात परिचित होत्या. अनेक गरजूंना त्यांनी सढळ हस्ते मदतही केली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी काझी यांनी बाग काझी येथील निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात लियाकत, शकिल, अशफाक असे तीन मुलगे, दोन मुली, चार सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी बाग काझी कबरस्तान मध्ये दफन विधी करण्यात आले.











