रत्नागिरी ः प्रतिनिधी :तिवरे ते संगमेश्वर असा दुचाकीवरुन प्रवास करणार्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी चालक आणि मागे बसलेला प्रौढ जखमी झाले.अपघाताची ही घटना रविवार 26 नोव्हेंबर रोजी रात्री 10.15 वा.कारभाटले येथे घडली.
प्रभाकर पाडूरंग कदम ( 58, रा. कन्नामकार, विक्रोळी-ठाणे) व सुदर्शन प्रकाश कदम ( 42, रा. असगावरोड, ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. रविवार 26 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा10.15 वा. सुमारास प्रभाकर व सुदर्शन हे दोघे दुचाकीवरुन तिवरे ते संगमेश्वर असे जात असताना कारभाटले येथील रस्त्यावर आले. त्यावेळी समोरुन येणारा टेम्पो (क्र. एमएच-04 एस 5871) वरिल चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.









