नांदरूख श्री देव गिरोबा मंदिर जत्रोत्सव उद्या

चौके | प्रतिनिधी : नांदरुख गावचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे, सकाळी मंदिरात पूजाअर्चा नंतर दुपारी श्री देव बिरोबा ची प्रतिकृती मोहरा सजवले जाते. रात्री पलीकडचीवाडी येथील मांडावरील घरातून पालखी वाजतगाजत मंदिरकडे आणली जाते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात विसावते यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो यावेळी मोठ्या प्रमाणावर माहेरवाशीने ओट्या भरण्यास येतात. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते.रात्रो पुन्हा मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होते. यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जातो. पहाटे कार्तिक कृष्ण तृतीयेचे गाडगे फोडून जत्रोत्सवाची सांगता होते.