चौके येथील किराणा व्यापारी विलास आंबेरकर यांचे निधन

चोके l प्रतिनिधी :चौके स्थळकरवाडी – बाजारपेठ येथील जेष्ठ किराणा व्यापारी विलास नारायण आंबेरकर (68) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दुःखत निधन झाले.आज सकाळी चौके स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.विलास गेले काही दिवस आजाराने त्रस्त होते.जिल्हा व्यापारी पतसंस्था संचालिका विनिता आंबेरकर यांचे पती होते. तर उदयोजक नाना आंबेरकर यांचे भाऊ तसेच चौके येथील हॉटेल व्यवसायिक प्रकाश आंबेरकर व किराणा व्यापारी सुनील आंबेरकर यांचे भाऊ होते. त्यांच्या पच्यात दोन मुलगे,मुलगी,सून,जावई नातवंडे भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.विलास यांच्या अकाली जाण्याने चौके पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे