रत्नागिरी : तालुक्यातील फणसवळे-करबुडे जि.प गटातील ( केळे, मजगाव ) पंचायत समिती गणातील अनेक ग्रामस्थांनी मनसेत पक्षप्रवेश केला.
मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्षरूपेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, रूपेश चव्हाण, सौरभ पाटील, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, अमोल श्रीनाथ , विभाग अध्यक्ष जयेश फणसेकर, सोम पिलणकर, नवनाथ साळवी आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.











