रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातील निवृत्त वेतनधाकरकांसाठी महालेखापाल, मुंबई यांच्यामार्फत 8 डिसेंबर रोजी शामराम पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये भविष्य निर्वाह निधी/निवृत्तीवेतन संबधित समस्या आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मा. महालेखापाल, मुंबई यांच्या कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी व निवृत्तीवेतनधारकांनी या अदालतीमध्ये सहभागी होवून या संधीचा फायदा घ्यावा, असे जिल्हा कोषागार अधिकारी रा.बा. मोरे यांनी आवाहन केले आहे.











