कोकणातील कुणबी समाज आक्रमक, कुणबी समाजाच्या वतीने गुहागर पोलिसांना दिले निवेदन

माथेफिरू गुंड गणेश कदमचा बंदोबस्त करा

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुंड गणेश कदम आणि साथीदारांचा बंदोबस्त करा, जीवघेणा हल्ल्याचे गुन्हे दाखल करा. सर्व आरोपींना शोधून अटक करा, गणेश कदम याला कोकणातील हद्दीतून कायमचा तडीपार करा, अशा विविध मागण्याचे निवेदन गुहागर तहसीलदार यांना गुहागर तालुका कुणबी समाजाच्यावतीने मंगळवार २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता, तालुक्यातील नेतृत्व हुमणे गुरुजी, कृष्णाजी वणे, राजेश बेंडल आणि प्रमुख नेते यांच्या उपस्थित देण्यात आले. बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी बेकायदेशीर संघात घुसून आपल्या साथीदारासह कुणबी समाजाची अस्मिता, मातृसंस्थाच्या परेल येथील कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला होता. आक्षेर्पाह पोस्टची खातरजमा न करता मनसेच्या काहि माथेफिरुंकडून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ह्या मातृसंस्थेत घूसून युवा पदाधिकार्‍यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करुन ह्या अशा विकृत माथेफिरुंचा बंदोबस्त करण्यासाठी मा. गुहागर तहसिलदार व मा. गुहागर पोलिस ठाणे यांना मंगळवार, दि.२४ रोजी निवेदन देण्यात आले आहे. तालुका ग्रामिण शाखा, गुहागर-पालशेत-हेदवी-तवसाळ गट, युवक मंडळ आणि महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भ्याड हल्ल्याचा समस्त ओबीसी व कुणबी समाज जाहीर निषेध करीत आहे.