गुहागर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेची निपुण भारत अंतर्गत गुणवत्ता पडताळणी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा गंगावणे यांनी केली शाळेच्या प्रगती बद्दल त्यांनी प्रशंसानीय उद्गार काढले उपक्रमशील शाळेचे त्यांनी कौतुक केले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी म्हणून अबोली येथे रुजू झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मार्फत त्यांचा शाल श्रीफळ व स्मरणिका देऊन गौरव करण्यात आला .
त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी चेतना जाभारकर ,शिल्पा कोळथरकर, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोळथरकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील ,अंजली मुद्दमवार, सोनाली खडपे, रेवती साखरकर ,परीक्षित दाभोळकर ,स्वीकृत सदस्य सलोनी पालशेतकर ,नैतिक . हरंचकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.












