सावंतवाडी – दिवा पॅसेंजर धावली तीन तास विलंबाने प्रवाशांची रखडपट्टी

खेड (प्रतिनिधी)कोकण मार्गावरून धावणारी १०१०६ क्रमांकाची- सावंतवाडी – दिवा पॅसेंजर सोमवारी तब्बल तीन तास विलंबाने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अन्य रेल्वेगाड्यांही उशिरानेच मार्गस्थ झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

 

१०१०५ क्रमांकाची दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे तर १२१३४ क्रमांकाची

मंगळूर- सीएसएमटी एक्सप्रेस १ तास विलंबाने रवाना झाली. १२४८४ क्रमांकाची कोचुवेली एक्सप्रेस २ तास तर १६३४५ क्रमांकाची एलटीटी -तिरुवअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस १ तास २० मिनिटे उशिराने धावली. दिल्लीकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेसही विलंबाने धावली.

 

यापाठोपाठ २२११४ क्रमांकाची कोचुवेली-एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस एक तास विलंबाने रवाना झाली. रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना पुन्हा फटका बसला.