रत्नागिरी : रामआळी येथील दुकानातून अज्ञात चोरट्याने लंपास केला मोबाईल

रत्नागिरी | प्रतिनिधी : बाजारपेठेतील रामआळी येथील दुकानातून अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची घटना 25 नोव्हेंबर 2023 रोजी घडली आहे.
याबाबत निलेश शामकांत मलुष्टे (64,रा.रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,त्यांचे रामआळी येथे मुलष्टे स्टिल पाईप नावाचे दुकान आहे.या दुकानात ते बिलिंगसाठी मोबाईलचा वापर करतात.25 नोव्हेंबर रोजी त्यांचा हा बिलिंगचाच मोबाईल चोरीस गेला. त्यांनी दुकानातील सिसीटिव्ही फूटेज तपासले असता त्यांना एक अज्ञात मोबाईल नेताना दिसून आला.याप्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंत अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.