मसुरे | झुंजार पेडणेकर : रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली मंदिर जीर्णोद्धाराचा २३ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती उत्सवास प्रारंभ झाला असून २९ जानेवारी रोजी सांगता होणार आहे. गणपतीची मूर्ती रेवंडी येथील प्रसिद्ध मूर्तिकार तारक कांबळी यांनी साकारली आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना वर्सलदार मानकरी यांच्या हस्ते झाली. त्यानंतर आरती, महाप्रसाद, रात्री ‘तुका म्हणे आता’ दोन अंकी संगीत नाटक झाले. २६ जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद, रात्री वाजता स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार, रात्री १० वाजता गोकुळचा चोर सादरकर्ते – सर्जेकोट ग्रामस्थ आणि शाळेतील मुले यांचे दशावतारी नाटक होणार आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, माता कलावती आई महिला भजन सर्जेकोट यांचे सुश्राव्य भजन, रात्री १० वाजता श्री भद्रकाली दशावतार नाट्य मंडळ पेंडुर यांचे दशावतारी नाटक . दिनांक २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता श्री स्वामी समर्थ मठ (समर्थ गड आडवली) या मठातून श्री भाई महाराज आपल्या सहकारी महिला व पुरुष समर्थगड सेवेकरी यांच्या समवेत येणार असून यावेळी वारकरी दिंडी आणि मठातील आरती सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद होऊन त्यानंतर दुपारी ३ वाजता श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भद्रकाली देवस्थान कमिटी तर्फे करण्यात आली आहे.