पणदेरी-पेवे पंचक्रोशी हायस्कूलचे विज्ञान प्रदर्शनात यश.

 

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई संचालित पणदेरी – पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी या विद्यालयाने 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश संपादन करून प्रशाळेचे नाव उज्वल केले आहे,

माध्यमिक गटात कु श्रवणी मोरे व श्रवणी पालवणकर या दोघीनी बनवलेल्या हवेतील प्रदूषण नियंत्रण करण्याच्या प्रतिकृती ला तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्यास्तरीय विज्ञान प्रदर्शनास पात्र ठरल्यामुळे व विज्ञान शिक्षक श्री.इंगळे सर यांनी बनवलेल्या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याबद्दल आज दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी,शालेय समितीच्या वतीने आणि पालक-शिक्षक संघाच्या वतीने विजेत्यांचा मा श्री रामदास रेवाळे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेतील सर्व विध्यार्थी,पालक शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते