गुहागर | प्रतिनिधी : दि.०९/१२/२०२३ रोजी गुहागर येथिल शृंगारतळी मोहल्ला येथे घराच्या परिसरामध्ये खवले मांजर आल्याची माहीती दुरध्वनीव्दारे वन विभागाला मिळाली. त्याअनुषगांने वनपाल गुहागर, वनरक्षक यांचेसह तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता मौजे गूहागर शृंगारतळी मोहल्ला परिसरामध्ये खवले मांजर आढळून आले. त्यास सुरक्षित ताब्यात घेवून, पशुवैद्यकिय अधिकारी याचे कडुन वैद्यकीय तपासणी करुन घेतले. वैद्यकीय तपासणी नंतर सदरचे खवले मांजर सुस्थितीत असलेचे पशुवैद्यकीय अधिकारी सांगितले त्यानंतर सदरचे खवले मांजरास नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करणेत आले. या बचावकार्यात वनपाल गुहागर, श्री. संतोष परिशेट्टये वनरक्षक, श्री. अरविंद मांडवकर यांनी खवले मांजरास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदरचे बचावकार्य मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, व मा. सहाय्यक वनसंरक्षक (अ.का), रत्नागिरी (चिपळूण), श्री. वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमती राजश्री चं. कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण, व त्यांचे अधिनस्त वनपाल गुहागर, श्री. संतोष परिशेट्टये, वनरक्षक, श्री. अरविंद मांडवकर यांनी पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.












