राजापूरकर कॉलनी येथे जमिनीवर जबरदस्ती घुसखोरी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील राजापूरकर कॉलनी येथील फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीतील जबरदस्ती घूसून चिर्‍याचे बांध तोडत शिवीगाळ व धक्काबुक्की केली.ही घटना मंगळवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 12.15 वा.घडली.
याप्रकरणी फजल लतीफ गिरकर (रा.राजापुरकर कॉलनी,रत्नागिरी) आणि अन्य दोन अज्ञात या तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या विरोधात शमीन अब्दुल सत्तार पडवेकर (64,रा. राजापुरकर कॉलनी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्युनसार,मंगळवारी दुपारी दोन अज्ञात शमीन पडवेकर यांच्या मालकीच्या जागेत घुसले.

ते पारीने त्यांच्या जागेचे चिर्‍याचे बांध तोडत असताना फिर्यादी यांनी त्यांना पाहिले.त्यांनी संशयितांकडे चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत संशयित त्यांच्या अंगावर धाउन गेले.तसेच आपल्या हातातील हत्यारे फिर्यादींच्या अंगावर उगारुन ठार मारण्याची धमकी दिली.

परंतू,फिर्यादींनी पुन्हा त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयितांनी आम्हाला फजल गिरकर यांनी पैसे देउन तुम्हाला मारण्यासाठी व जागेचे बांध पाडण्यासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान फिर्यादी त्यांना थांबवण्यासाठी पुढे गेले असतान संशयितांनी त्यांनी शिवीगाळ करत या जागेत पुन्हा दिसलास तर बघून घेईन अशी धकमी देत धक्का मारुन पळून गेले.याप्रकरणी शमीन पडवेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 447,352,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.