बांदा | प्रवीण परब : कास ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रेया शांताराम राणे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. सरपंच प्रविण पंडित यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कास उपसरपंच गजानन पंडीत यांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. बुधवारी याबाबतची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सभेत उपसरपंच पदी श्रेया राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य निकिता कासकर, रुक्मिणी पंडित, ग्रामसेवक विनय धाकोरकर, पोलीस पाटील प्रशांत पंडित, विठ्ठल पंडीत, शांताराम राणे, ओमकार राणे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक विनय धाकोरकर यांनी काम पाहिले.











