खेड (प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे- रत्नागिरी विभागादरम्यान १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत मालमत्ता देखभालीच्या कामासाठी २ तास ३० मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे.
१२६१७ क्रमांकाची एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस १४ डिसेंबर रोजी मडगाव- रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटे, तर २०९२३ क्रमांकाची तिरूनेलवेली- गांधीधाम एक्सप्रेस १४ डिसेंबर रोजी
मडगाव- रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.











