खेड | प्रतिनिधी : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ विशेष ट्रेन चालवन्यात येणार आहेत
०१४२७ पनवेल – मडगाव जं. विशेष -६ फेऱ्या
दि. २२.१२.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी २१.१० वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ६.५० वाजता पोहोचेल.
०१४२८ मडगाव – पनवेल विशेष -६ फेऱ्या
मडगाव जं. दि. २२.१२.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.
संरचना: २२ डब्बे- ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.
➡️०१४३० मडगाव – पनवेल विशेष- १ फेरी
मडगाव येथून दि. ०१.०१.२०२४ रोजी २१.००वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०७.२० वाजता पोहोचेल.
➡️०१४२९ पनवेल – मडगाव विशेष- १ फेरी
पनवेल येथून दि. ०२.०१.२०२४ रोजी ८.२० वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
➡️थांबे: रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
➡️संरचना: २२ LHB डब्बे- ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.












