शनिवार दिनांक 16 डिसेंबर,2023 रोजी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था शाखा शृंगारतळी येथे सकाळी ठीक 10.00 वाजता प्रथम वर्धापन दिन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथम वर्धापना दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी आपण सर्वांनी या मंगल समयी उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व आमचा आनंद द्विगुणित करावा अशी आपणा सर्वांना संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी ,उपाध्यक्ष सुधीर वासवे ,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे,शृंगारतळी शाखेचे शाखा पालक संचालक रमेश जाक्कर,सह पालक संचालक संदीप वणकर, शाखाधिकारी राज डोर्लेकर,समन्वय समिती सदस्य संजय पावसकर ,श्रीमती दीप्ती अजगोलकर ,सागर नाटेकर व कर्मचारी वृन्दाच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आली आहे.












