सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

साहसी क्रीडा प्रकारांसह संचलन ठरणार आकर्षण 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली स्कूलचा २० वा वर्धापन दिन २१ व २२ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी श्री. एस. नवकिशोर रेड्डी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तर २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल एम. सी. मुथण्णा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथीना मानवंदना, संचलन,

विविध साहसी प्रात्यक्षिके, लेझीम,

‘वेध’ वार्षिक अंकाचं प्रकाशन असा लष्करी थाटात कार्यक्रम होणार आहे.

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्यावतीने वर्धापन दिन कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.