चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील बामणोली येथील नवतरुण मित्र मंडळ डिंगणकर वाडीचे ज्येष्ठ सभासद कै. तुकाराम महादेव कुळे यांचे दिनांक. १८ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुळे परिवार द्दुखाच्या छायेत आहे.
अतिशय मेहनती व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. गरिबीतून त्यांनी आपल्या कुटुंबाचा संभाळ केला होता. त्यांच्या निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सूना, दोन मुली, नातवंडे अशा परिवार आहे. त्यांचे कार्य त्यांच्या राहत्या घरी होईल.











