डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नशा मुक्त अभियानाने विद्यार्थ्यामध्ये जनजागृती…

मंडणगड l प्रतिनिधी-          मुंबई विद्यापीठ संचालित, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एन.एस.एस. विभाग आणि प्रजापिता ब्रम्हाकुमारी आश्रम खेड यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दारू, ड्रग्स, तंबाखू, सिगारेट यावर आधारित नाटिकीच्या माध्यमातून व्यसन मुक्ति या विषयावर विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सहा. प्रा. अमोल राजेशिर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून व्यसन मुक्त भारत अभियान यावर थोडक्यात आपले विचार मांडले.

सहा. प्रा. अरुण ढंग यांनी व्यसन मुक्ति यावर बोलताना म्हणाले की समाजामध्ये व्यसन असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून यामध्ये युवक वर्ग जास्त प्रमाणात बळी पडत आहे. असे सांगून त्यांनी व्यसनांच्या प्रभावांचे आणि ते कसे टाळण्याचे यावर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी दारू, ड्रग्स, तंबाखू, सिगारेट यावर आधारित नाटिकीचे सादरीकरण प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांच्या कलाकारांनी केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल दिगंबर हेमके तर आभार मंगेश ठसाळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.