राजापूर (वार्ताहर): शहरासह तालुक्यात क्रिकेटप्रेमी दर्शक व युवा खेळाडू तसेच राजापूरकरांसाठी गेली काही वर्षे पर्वणी ठरलेली यंदाची आम्ही राजापूरकर आयोजित राजापूर अंडरआर्म प्रिमिअर लिग २०२४ (आरयुपीएल) ही स्पर्धा १७ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली.
दरवर्षी शेकडो प्रेक्षक आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेची घोषणा स्पर्धेचे मुख्य आयोजक व अध्यक्ष स्वप्नील गोठणकर यांनी केली आहे.
राजापूर अंडरआर्म प्रीमिअर लिग २०२४ (आरयुपीएल) स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष आहे. या स्पर्धेदरम्यानच १८ ते २० जानेवारी या दरम्याने खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. डान्स स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी संजय मांडवकर मोबा. ७७७००५१५२६ या क्रमांकावर नोंदणी ये णाच्या १२ ग्रुपना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी नसल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
दरम्यान राजापूर अंडरआर्म प्रिमिअर लिग २०२४ स्पर्धेसाठी खेळाडूंची नोंदणी २० डिसेंबर ते चार जानेवारी २०२४ या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. अधिक माहिती व फॉर्म मिळण्याचे ठिकाण म्हणून सुशील टिळेकर राधाकृष्ण कोल्ड्रींक्स जवाहर चौक राजापूर तसेच श्री. निलेश खानविलकर श्रीसाई स्पोर्टस् जवाहर चौक राजापूर या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे.












