न. प. प्रशासनाकडून तयारी हाती
राजापूर (प्रतिनिधी): केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहित देतानाच त्या योजनेसाठी पात्र लाभार्थींना तात्काळ लाभ देणारी व या योजनांबाबत जनजागृती करणारी विकसित भारत संकल्प यात्रा मंगळवारी २६ डिसेंबर रोजी राजापुरात येत आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेचा राजापूर शहरात नगर परिषदेच्या वतीन स्वागत केले जाणार आहे.
मंगळवारी दुपारी ३ वाजता ही विकसित भारत संकल्प यात्रा राजापूरात दाखल होणार असून जवाहर चौकात या यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा गणेशविसर्जन घाटावर जाणार असून या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात या यात्रेबाबत माहिती देतानाच या ठिकाणी विविध योजनांच्या लाभार्थीना लाभ दिला जाणार अहे.
शासनाच्या सर्व योजने जनतेपर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेपर्यंत कसे पोहोचता येईल या दृष्टीने केंद्र व राज्य शासन सरकारच्या सहभागातुन ही विकसित भारत संकल्प मात्रेयी मोहीम देशभरात राबविली जात आहे. २६ जानेवारीपर्यंत अशा प्रकारे सर्वत्र ही यात्रा पोहचणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी २६ डिसेंब रोजी ही यात्रा राजापुरात येत आहे. राजापुर शहरात जवाहर चौकात दुपारी ३ वाजता ही विकसित भारत संकल्प याच्या अभियान रथाचे आगमन होणार असून या ठिकाणी राजापूर तहसीलदार सौ. शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांसह मान्यवर या यात्रेचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर ही यात्रा गणेश विसर्जन घाटावर नेण्यात येणार असून या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात या यात्रेबबात व योजनांबात माहिती दिली जाणार आहे.
या विकसित भारत संकल्प मात्रेत शहरी भागात पीएम आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, पीएम सुरक्षा बीमा योजना, शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याने काम का माध्यमातून केल्या जाणार आहे. यासाठी लाभार्थींनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन न. प. प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या यात्रेच्या स्वागताची व योजनांबाबत माहिती देऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी न. प. प्रशासनाकडून नियोजन हाती घेण्यात आले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











