खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नागपूर – मडगाव स्पेशलला मुदतवाढ नागपूर-मडगाव देण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार स्पेशल ३१ मार्चपर्यंत धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
नागपूरमधून थेट कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या नागपूर-मडगाव स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. याचमुळे स्पेशलला मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
मागील काही महिन्यांपासून ०११३९/०११४० क्रमांकाच्या नागपूर-मडगाव स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. या स्पेशलला ३ जानेवारी ते ३० मार्च तर परतीच्या प्रवासात ४ जानेवारी ते ३१ मार्च याकालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.










