दापोली l प्रतिनिधी: आज दापोली दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भाचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या सर्व मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन मा.शिक्षणमंत्री यांनी दिले.
या निवेदनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, नवभारत साक्षरता सर्वेक्षण काम तसेच BLO अशी अशैक्षणिक कामे प्राथमिक शिक्षकांना न देणे,वेतनेतर अनुदान मिळणेबाबत, या मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, तालुकाध्यक्ष विजय फंड, संचालक अशोक मळेकर, सचिव महेश महाडीक, उपाध्यक्ष भालचंद्र घुले, दत्तात्रय गिलबिले,सुरेश खुळे, सुरेंद्र खताते आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.












