मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील खाक्षी येथील रहिवासी व चारकोप- मुंबई येथील शिवसेना माजी नगरसेवक अविनाश तुकाराम पेडणेकर (७७ वर्ष) यांचे अल्प आजाराने मुंबई येथे निधन झाले. अनेक संगीत नाटकांना दिग्दर्शन करण्या बरोबरच भजनी बुवा म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक कालावधीत अनेक विकास कामांना त्यांच्या पाठपुराव्याने चालना मिळाली होती.
विविध राजकीय पक्षात मोठा मित्र परिवार त्यांनी जोडला होता. अंतिम संस्कार प्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार विनोद घोसाळकर, माजी नगरसेवक श्रीकांत कवठणकर तसेच माजी नगरसेवक, शाखा प्रमुख आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ, भावजयी,पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड चे सचिव नंदकुमार पेडणेकर यांचे भाऊ होत.











