विकसित भारत संकल्प यात्रेच राजापुरात उस्फुर्त स्वागत

 

अनेक लाभार्थींना घेतला शासनाच्या योजनांचा लाभ

राजापूर (प्रतिनिधी): केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहित देतानाच त्या योजनेसाठी पात्र लाभार्थींना तात्काळ लाभ देणारी व या योजनांबाबत जनजागृती करणारी विकसित भारत संकल्प यात्रेचे मंगळवारी राजापुरात उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

मंगळवारी दुपारी ३ वाजता ही विकसित भारत संकल्प यात्रा राजापूरात दाखल झाली. यावेळी जवाहर चौकात या यात्रेचे नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी बांधकाम अभियंता संजीव जाधव, लेखापाल प्रशांत फोडकर, कर विभागाचे व यात्रा नियोजन समितीचे प्रमुख अविनाश नाईक, नगर परिषदेचे स्वच्छता दूत व ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, माजी नगराध्यक्षा सौ. कल्याणी रहाटे, माजी नगरसेविका सौ. शीतल पटेल आदींसह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

त्यानंतर ही यात्रा गणेशविसर्जन घाटावर आली व या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताच्या विकासाचा संकल्प व योजना यांची माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. शासनाच्या सर्व योजने जनतेपर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेपर्यंत कसे पोहोचता येईल या दृष्टीने केंद्र व राज्य शासन सरकारच्या सहभागातुन ही विकसित भारत संकल्प मात्रेयी मोहीम देशभरात राबविली जात आहे.

या ठिकाणी राजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरी भागात पीएम आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, पीएम सुरक्षा बीमा योजना यांचे स्टॅाल लावण्यात आले. या ठिकाणी पात्र लाभार्थींना लाभ देण्यात आला. या ठीकाणी लाभार्थींनी गर्दी केली होती. तर यावेळी आपला बाळासाहेब ठाकरे दवाखानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरातही अनेकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. यावेळी प्रधानमंत्री स्वनिधी व अन्य योजनांतुन लाभ घेतलेल्या लाभामुळे कसा फायदा झाला याबाबत आपले मनोगत व्यक्त केली.