पानवल येथील आंब्याच्या बागेत बेशुद्ध सापडलेल्या नेपाळी कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील पानवल येथील आंब्याच्या बागेत बेशुध्द अवस्थेत मिळून आलेल्या नेपाळी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला.ही घटना सोमवार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा.उघडकीस आली.
काले चन्कुनू चौधरी उर्फ काळुराम डंगोरिया (65,रा.सध्या रा.पानवल,रत्नागिरी मुळ रा.नेपाळ) असे मृत्यू झालेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. सोमवारी सकाळ पासूनच तो खबर देणार यांना कोठेही दिसून आला नाही.सायांकाळी 7 वा.सुमारास तो सर्फराज उमर धामस्कर यांच्या आंब्याच्या बागेत बेशूध्द अवस्थेत मिळून आला.त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.