रत्नागिरी ः प्रतिनिधी : मच्छिमारी बोटीवरुन बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह मिरकरवाडा बे्रक वॉटर येथून समुद्राच्या पाण्यात मिळून आला.ही घटना सोमवार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा.उघडकीस आली.
रमतकुमार धनीराम चौधरी (24,मुळ रा.नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे.रमतकुमार हा खबर देणार यांच्या मच्छिमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. तो शनिवार 23 डिसेंबर रोजी बोटीवर कोणालाही न सांगता निघून गेला होता.याबाबत खबर देणार यांनी शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली होती.
दरम्यान,सोमवार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी बे्रक वॉटर येथे फिशिंग करणार्या बोटीला एका अज्ञाताचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला.त्या बोटीवरील कामगारांनी त्याला आपल्या बोटीतून मिरकरवाडा जेटी येथे आणले.तेथून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी रमतकुमारला तपासून मृत घोषित केले.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.










