एन. एस. एस.शिबिरार्थीनी घेतले आपत्ती व्यवस्थानाचे ट्रेनिंग

शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर नेतृत्व गुण विकास शिबीर रत्नागिरी मध्ये सुरू आहे. या शिबिरात तिसऱ्या दिवशी NSS स्वयंसेवकांना आपत्ती व्यावस्थापन करण्याचे ट्रेनिंग देण्यात आले.

यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. अजय सूर्यवंशी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कशी कार्य करते याची उदाहरण देऊन माहिती दिली.

यानंतर श्री. लहू मालगावी यांनी सहाय्यक उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल यांनी प्रथमोपचार, उचल पद्धती व रोप नॉट ची प्रात्यक्षिक दाखविले. यानंतर midc अग्निशमन दलाच्या टीम ने अग्निशमन चे प्रात्यक्षिक दाखविले यामध्ये श्री. यशवंत नलावडे अग्निशमन अधिकारी, श्री. आनंद राऊत प्रमुख अग्निशमन विमोचक, आणि अग्निशमन विमोचक श्री. किशोर जाधव श्री. राजेंद्र रावराणे, श्री. ,राजेंद्र महाडिक यांनी प्रत्यक्षिकात सहभाग घेतला. तसेच श्रीम. सीमा डोंगरे आय टी असिस्टंट जिल्हा नियंत्रण कक्ष या उपस्थित होत्या.

कोल्हापूर विभाग समन्वयक प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व श्री. लक्ष्मीकांत पाटील यांनी आभार मानले.