गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुका चर्मकार विकास मंडळाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती जानवळे येथे साजरी करण्यात आली. संत रोहिदास यांना महाराष्ट्रात रोहिदास असे संबोधिले जाते.उत्तर प्रदेशातील काशी जवळील मांडूळ गावी त्यांचा जन्म झाला तिथे त्यांना रविदास नावाने ओळखले जाते.संत रोहिदास महाराज १४ व १५ शतकात होऊन गेले त्या काळात जन्म तारखांची नोंद ठेवली जात नव्हती, कॅलेंडर नावाची वस्तू त्या काळात अस्तित्वातच नव्हती, समानतेचे तत्व मांडणारे जगातील पहिले महान योगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती जानवले येथे गुहागर तालुका चर्मकार विकास मंडळाच्या वतीने धर्मदास जानवळकर यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. समाजासाठी एकत्र येऊन काम करणे काळाची गरज आहे,सर्वांनी राजकारण सोडून समाजासाठी एकत्र यावे. प्रत्येक घराघरात समाज जनजागृती मोहीम लवकरच चालू करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हा सचिव संतोष पालशेतकर, गुहागर तालुका अध्यक्ष विजय जानवळकर, जिल्हा स्वीकृत सदस्य विनोद जानवळकर,सुधीर कोंडविलकर (माजी अध्यक्ष) बाळकृष्ण शिर्के (माजी अध्यक्ष), तेजस कोंडविलकर, अशोक जानवळकर (सल्लागार),दिनेश जानवळकर, नथुराम जानवळकर ,विश्वनाथ कोंडविलकर,सिद्धार्थ पालशेतकर, वैभवी जानवळकर(ग्रामपंचायत जानवळे,सदस्य), शैला पालशेतकर,(ग्रामपंचायत आबलोली,सदस्य), कल्पना जानवळकर, मंगेश कोंडविलकर,स्नेहल जानवळकर नागेश जानवळकर ,दिनेश चिपळूणकर, विश्वनाथ जानवळकर,शैलेश पेवेकर, विवेक जानवळकर समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष पालशेतकर यानी तर आभार दिनेश जानवळकर यांनी मानले.