‘त्यांनी’ पाणबुडीच्या बाता मारू नये!

पर्यटन अभ्यासक आनंद हुले यांचा आ. वैभव नाईक यांना जोरदार टोला

मालवण | प्रतिनिधी : ज्यांना कोकण किनारपट्टीवर साधी कोकणबोट सुरू करता आली नाही. त्यांनी पाणबुडीच्या बाता मारू नये. असा जोरदार टोला मालवण येथील पर्यटन अभ्यासक आनंद हुले यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे.

वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील मालवण सागरमाला जेटीचा प्रकल्प गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. पण या शिवसेना (ठाकरे गट) आमदाराने कधीही पाठपुरावा केला नाही. मालवण सागरमाला जेटीचे दिवाळीपर्यंत लोकार्पण होईल असे मेरीटाईम बोर्डाने लेखी आश्वासन दिले होते, मात्र कार्यवाही झाली नाही. ज्यांना कोकण किनारपट्टीवर साधी कोकणबोट सुरू करता आली नाही त्यांनी पाणबुडीच्या बाता मारू नये. असा टोला मालवण येथील पर्यटन अभ्यासक आनंद हुले यांनी आ. वैभव नाईक यांना लगावला आहे.

आनंद हुले पुढे असेही म्हणाले, संसदेने 2017 मध्ये सागरमाला योजना परीत केली. या अंतर्गत भारतात कोकणातील निवती रॉक वेंगुर्ला, गुजरात द्वारका या भारतातील दोन ठिकाणी पाणबुडी प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र आपल्या येथे चर्चा झाली मात्र गुजरातच्या राज्यकर्ते यांनी तो प्रकल्प करून दाखवला. दोन्ही प्रकल्प एकाचवेळी जाहीर झाले. त्यामुळे महाराष्ट्र येथील आपला प्रकल्प गुजरातने पाळवला असे जर कोण म्हणत असतील तर ती माहिती चुकीची आहे. अशी ठाम भूमिका आनंद हुले यांनी मांडली.