निलम भालेकरचा विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या वतीने निलम भालेकर हिचा विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, लक्ष्मण बांदेकर, सुरेंद्र कासकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, रितेश चव्हाण, दयानंद रेडकर, सुरेश पन्हाळकर, प्रदिप भालेकर, जय भालेकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते. तसेच निलम भालेकर हिच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.