योगाला भाजपमुळे जागतिक स्तरावर वेगळी ओळख- डॉ. विनय नातू

चिपळूण (प्रतिनिधी) : वेगवेगळ्या विभागतील योग्य व्यक्तीचा आज नमो सन्मान देऊन सत्कार झाला. हा सत्कार सोहळा असणारी गर्दी पाहता हा सोहळा भाजपला चिपळुणात एक वेगळी ओळख देणारी ठरणार. पण हे करत असताना कार्यकर्त्यांनी आपली ओळख अशाच सोहोळ्यातून निर्माण करणे गरजेचे आहे. योगाला जागतिक स्तरावर भाजपने वेगळे ओळख निर्माण केली आणि आता खेडोपाडीही योगाचे शिक्षक आहेत हेच या दिवसाचे महत्व आहे असे मत माजी आमदार विनय नातू यांनी चिपळूणमधील नमो सन्मान सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे , तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, बापू काणे, रामदास राणे, विजय चितळे. आशिष खातू, रसिका देवळेकर, वसंत ताम्हणकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक शशिकांत मोदी यांनी तर सूत्रसंचालन मंदार कदम यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मोदी सरकारची अकरा याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच तालुकाध्यक्ष विनोद भुरण यांनी या कार्यक्रमाचे महत्व विशेष केले. हा सत्कार सोहोळा ब्राम्हण सहाय्यक संघ हॉल चिपळूण येथे आयोजित करण्यात आला.
सारिका भावे, शितल रानडे, निकिता रतावा, पुनम काजारी, प्रणाली सावर्डेकर, विमल लढ्ढा, अश्विनी वरवडेकर, वैशाली निमकर, विनायक वरवडेकर, कुणाल आंबेकर, निनाद आवटे, उल्हास भोसले, मंदार कदम, अनिल सावर्डेकर, अमित चिपळूणकर, स्वाती पटवर्धन, जतिन घटे, मधुकर निमकर, अभिषेक राजापूरकर, अभय चितळे , अश्विनी पवार, चेतन मालशे, प्रदिप शितप, प्रणय वाडकर यांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी एकूण ७५ जणांना नमो सन्मान देऊन गौरविण्यात आले.