दापोलीत शिवसेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध

दापोली | प्रतिनिधी : हिंदू धर्माचे प्रतीक अयोध्या प्रति प्रभू श्री रामचंद्र यांच्या बद्दल बेताल जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल हिंदू समाजात मोठ्या प्रमाणात भावना दुखावून असंतोष निर्माण झाला आहे.

त्याबद्दल दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने ठाण्याच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज दापोलीत निषेध करण्यात आला व प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले तहसीलदार अर्चना घोलप बोंबे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका विधानसभा समन्वयक प्रदीप सुर्वे, मधुकर दळवी माजी नगसेवक प्रकाश साळवी, नगरसेविका शिवानी खानविलकर, युवासेना शहर अधिकारी स्वप्निल उर्फ बाबू पारकर, निखिल परब, किरण बांद्रे, नदीम मुकादम, शशांक घाग, मंदार केळकर, सुनील रिसबूड,आदी उपस्थित होते.