सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची केली घोषणा

कणकवली : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची सिंधुदुर्ग कार्यकारिणी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी जाहीर केली आहे. यात सरचिटणीस पदी श्री.जावेद हुसेन खतिब बांदा सावंतवाडी,सरचिटणीस श्री.सौरभ ताम्हणकर मालवण ,सरचिटणीस श्री.संतोष प्रकाश पुजारे वरवडे कणकवली तर उपाध्यक्ष श्री.भास्कर उर्फ(संदेश) विरेश नाईक नेरूर कुडाळ,उपाध्यक्ष श्री.प्रसाद कृष्णा पाटकर परूळे बाजार वेंगुर्ले,उपाध्यक्ष श्री.राकेश अशोक सावंत घुमडे मालवण,उपाध्यक्ष हुसेन बादशहा लांजेकर कोळपे वैभववाडी ,उपाध्यक्ष श्रीम.चांदणी शरद कांबळी कुडाळ, उपाध्यक्ष श्री.भुषण आंगचेकर वेंगुर्ले यांची निवड करण्यात आली आहे.

चिटणीस पदी श्री.देवेंद्र रामकृष्ण शेटकर खोक्रल दोडामार्ग,चिटणीस श्री.गणेश मंगेश तळगांवकर करंजे कणकवली,चिटणीस श्री.चेतन राजन ढवळ घोटगे कुडाळ,चिटणीस श्री.यश सुभाष रानडे देवगड, चिटणीस श्री.मंगेश विजय पारकर मिठबांव देवगड, चिटणीस श्री.रोहन जयेंद्र रावराणे वैभववाडी, चिटणीस श्री.संताजी अरविंद रावराणे वैभववाडी, चिटणीस श्रीम.सान्वी भरत गावडे हळवल कणकवली, चिटणीस श्री. संग्राम सुधीर साळसकर महान मालवण सोशल मिडीया संयोजक श्री. मंदार सुहास पडवळ पडवे कुडाळ याची निवड करण्यात आली आहे.