केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्ता सामंत यांचा वाढदिवस साजरा…

दत्ता सामंत भाबडा निर्मळ कार्यकर्ता ; राजकारण व व्यवसाय उद्योगात त्याने नाव केले : मंत्री नारायण राणे यांच्याकडून कौतुक…

2024 ला भाजप नेते निलेश राणे आमदार बनवणारच : दत्ता सामंत

अमित खोत | मालवण : भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक दत्ता सामंत यांचा 55 वा वाढदिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौं. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारमाठ निवासस्थानी साजरा करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री झालो. त्यात मालवणचे मोठे योगदान. मालवण, कणकवली, कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने नेहमी प्रेम दिले. दत्ता सामंत सारखे अनेक सहकारी सोबत राहिले. त्यांच्या सारख्या असंख्य कार्यकर्ते झिजले आणि आम्ही मोठे झालो. दत्ता सामंत भाबडा निर्मळ कार्यकर्ता आहे. राजकारण व व्यवसाय यात त्याने नाव केले. माझ्या सर्व निवडणुकीत माझ्या सोबत राहिला. दत्ता बद्दल माझ्या मनात कधीही गैरसमज असणार नाही. असे सांगत मंत्री राणे यांनी दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या तसेच दीर्घायुष्य साठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, 2024 ला भाजप नेते निलेश राणे यांना आमदार बनवणारच असा ठाम विश्वास दत्ता सामंत यांनीही वाढदिवस निमित्ताने व्यक्त केला.

यावेळी सौ. दिव्या सामंत, निला तिरोडकर, कु. सान्वी सामंत, कु. जय सामंत, संदीप कुरतडकर, बाळू कुबल, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, सुनील घाडीगावकर, राजा गावडे, मधुकर चव्हाण, घुमडे सरपंच स्नेहल बिरमोळे, माजी जिप अध्यक्ष सरोज परब, माजी उपासभापती राजू परुळेकर, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, आप्पा लुडबे, बाळा गोसावी, बाळा माने, दीपक नारकर, संदीप साटम, सुशांत घाडीगावकर, उमेश बिरमोळे, मंदार लुडबे यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मला मोठे तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी केले. कधीही हक्काने हाक मारा.. माझ्या सर्व कार्यकर्ता असाच मोठा होउदे.. दत्ताला डबल आयुष्य लाभू दे…
तुमच्या सर्वांच्या प्रेमाला मोजमाप नाही… तुमच्या सारखी घरची माणसे…. हेच माझे सर्वस्व आहे.. अश्या भावना मंत्री राणे यांनी व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवात देश प्रगतीपथावर आहे. असा नेता देशाला लाभले हे आपले भाग्य असल्याचे सांगत पंतप्रधान यांच्या कार्याचे कौतुक करत केंद्र सरकार यांच्या योजनांची माहिती दिली.