‘पोरबंदर-कोच्युवेली’ला अतिरिक्त डबा वाढवला

खेड | प्रतिनिधी : कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर-कोच्युवेली एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. त्यानुसार २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर-कोच्युवेली एक्सप्रेस ११ जानेवारी रोजी तर परतीच्या प्रवासात १४ जानेवारी रोजी एक अतिरिक्त डब्यांची धावणार आहे.