नाणीजला उद्यापासून गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सुरु

Google search engine
Google search engine

सोमवारी भव्य शोभायात्रेद्वारे लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन

नाणीज : संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
सोमवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नाथांचे माहेर ते गजानन महाराज मंदिर सुंदरगड अशी ही शोभायात्रा राज्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवेल.
महामृत्यूनंजय याग-
हा सोहळा रविवार, सोमवार असा दोन दिवस आहे. रविवारी सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग व अन्नदान विधी, नामगजर आहे. दुपारी वरद चिंतामणी मंदिर व प्रभू रामचंद्र मंदिर येथे मिरवणुकीने सुंदर गडावरील सर्व देवतांना जाऊन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.
लोकसंस्कृतीचे दर्शन-
सोमवारी सकाळी ८ वाजता भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र इतर राज्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील कला सादर करणारी पथके असतील. याच शोभायात्रेत समाजप्रबोधनात्मक संदेश देणारे देखावे सादर होणार आहेत. यामध्ये ढोल- तासासह विविध वाद्यांचे गजरही असतील.
अन्य राज्यांचे देखावे-
या शोभायात्रेत कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आदी राज्यांतील लोकसंस्कृतीचे दर्शनदेखील घडणार आहे. तेथील लोककला पाहण्याची संधी येथे मिळणार आहे.
अमृतमय प्रवचन –
सकाळी नाथांचे माहेर येथे मिरवणूकीद्वारे जाऊन देवांना सोहळ्याचे निमंत्रण दिले जाईल. त्यानंतर यागाची समाप्ती, पालखी परिक्रमा सोहळा आहे.
रात्री प.पू. कानिफनाथ व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता होईल.
दोन दिवस आरोग्य शिबीर –
दोन्ही दिवस बारा व तेरा फेब्रुवारीला सकाळी ९ ते सायंकाळी ७ मोफत आरोग्य शिबीर होईल. या . सोहळ्यानिमित्त २४ तास महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे
——