रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालय व शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ साठी ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्काराकरिता आपली माहिती संक्षिप्त स्वरुपात शैक्षणिक उठाव, शैक्षणिक संशोधनपर निबंध, लेख, पुस्तके प्रकाशित, विषय/वर्गनिहाय निकाल १०० टक्के, कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी नियमावलीला अनुसरुन आपली माहिती बंदिस्त लिफाफ्यामध्ये प्राचार्या शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या नावे दि. ३० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी येथे माजी विद्यार्थी मंडळाचे कार्यालयात पाठवावयाची आहे. या लिफाफ्यावर ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार असा नामोल्लेख करावा तसेच ज्या शिक्षकांना यापूर्वी शासकीय पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करु नये.
असे शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाकडून कळविण्यात आले आहे.











