मराठी फलकांसाठी मनसे आक्रमक; २६ जानेवारीला उपोषणाचा छेडणार

खेड(प्रतिनिधी)
दुकानावर मराठी पाट्या लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने ४ महिन्यापूर्वी निर्णय दिला होता. मात्र गेल्या ४ महिन्यात या संदर्भात खेड तालुक्यात कोणतीही कारवाई केल्याचे दिसून आले नसल्याने मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी   खेडचे प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना २६  जानेवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन सादर करण्यात  आले.
महाराष्ट्रातील दुकानावर मराठी पाट्या लावल्या  पाहिजेत असा निर्णय . सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र खेड तालुक्यातील दुकानावर असलेल्या इतर भाषेतील फलक बदलले गेले नसून त्यावर खेड तालुका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसून न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढील ७ दिवसात कारवाई न केल्यास येत्या २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा सचिव संतोष नलावडे, दादू नांदगावकर, जयेश गुहागरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.