खेड युवासेनेतर्फे १४ रोजी सोलोनृत्य स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) खेड युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या संकल्पनेतून १४ जानेवारी रोजी समर्थनगर येथे सोलोनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 स्पर्धेतील विजेत्यास ५००१ रूपये. उपविजेत्यास ३००१ रूपये, तृतीय क्रमांकास २००१ रूपये व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवासेनेचे जिल्हा सचिव राकेश सागवेकर, शहरप्रमुख दर्शन महाजन, प्रसाद पाटणे, गौरव तोडकरी, साईराज खेडेकर प्रयत्नशील आहेत.