रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभाग अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड

कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर व शंकर कदम तर सचिव पदी उमेश कराडकर यांची बिनविरोध निवड

चिपळूण | प्रतिनिधी : रोहिदास समाजसेवा संघ ता. खेड या सामाजिक संस्थेअंतर्गत सातगाव विभागाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा संतोष सावर्डेकर यांची तर उपाध्यक्षपदी प्रभाकर पेवेकर व ह. भ. प. शंकर कदम, कार्याध्यक्ष पदी बळीराम कराडकर तर सचिवपदी उमेश कराडकर व खजिनदारपदी गणेश कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी उर्वरित कार्यकारणी देखील घोषित करण्यात आली.

रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभागातर्फे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात नुकतीच संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यानंतर सातगाव विभागाची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी विभाग अध्यक्ष संतोष सावर्डेकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, ह. भ. प. शंकर कदम, सचिव उमेश कराडकर, सहसचिव संजीवन कदम, संघटक रुपेश मासवकर, सहसंघटक मोहन कराडकर, खजिनदार गणेश कदम, सहखजिनदार प्रकाश पेवेकर, कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, सल्लागारपदी रामदास कराडकर, अनंत कदम, चंद्रकांत पेवेकर सदस्यपदी दत्ताराम कराडकर, सुजय कराडकर, सुनील कदम, संतोष कदम, महेश कदम, संतोष पेवेकर, सोनू पेवेकर, शंकर सावर्डेकर, रवींद्र मासवकर, निमंत्रक म्हणून यश कराडकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी संतोष सावर्डेकर यांनी आपल्या मनोगतात समाज बांधव व भगिनींनी आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले. पुढच्या तीन वर्षाच्या कालखंडात समाजपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही दिली.

यावेळी भिवराम कराडकर, हरिश्चंद्र कराडकर, आनंदा कदम, सुरेश कदम, ह. भ. प. श्री. कदम, श्रीधर पेवेकर, दिनेश आंबडसकर, सोनू पेवेकर, मोतीराम आंबडसकर, संतोष पेवेकर, मारुती कदम, शांताराम कदम, आशिष कदम, आशिष शंकर कदम, श्रीमती स्नेहा कराडकर, सौ. तारामती कराडकर, सौ. ललिता कराडकर, सौ. लक्ष्मी कराडकर, सौ. अनिता कदम, सौ. सुनिता कदम, सौ. अश्विनी कदम, प्रतिभा पेवेकर, सौ. वनिता पेवेकर, सौ. श्वेता सावर्डेकर, सौ. प्रियांका सावर्डेकर, सौ. रूपाली मासवकर आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन रुपेश मासवकर यांनी केले व आभार उमेश कराडकर यांनी मानले.