‘त्या’ लाचखोर महसूल सहाय्यकाला जामीन मंजूर

bribe
खेड(प्रतिनिधी) खेड तहसील कार्यालयात सुरू असलेली फौजदारी तक्रार मिटवून देण्याकरिता ३ हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या चंपलाल महाजन डेढवाल यास चिपळूण  न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता जिल्हा न्यायाधीश चिपळूण श्रीमती अनिता नेवासे यांनी २५ हजाराचा जामीन मंजूर करत सोमवारी व गुरुवारी हजेरी लावण्याची अट ही घालण्यात आली आहे संशयिताच्या बाजूने ऍड संदेश चिकणे यांनी काम पाहिले
महसूल सहाय्यकाने ५२ वर्षीय तक्रारदार यांच्याकडून फौजदारी तक्रार मिटवून घेण्यासाठी ३ हजार रूपयांची मागणी केली  होती त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्याला ३ हजार रूपयांचीलाच स्वीकारताना
अटक करण्यात आली होती. त्याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्याया लयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती
दरम्यान महसूल सहाय्यकाचा अहवाल  प्राप्त झाल्यानंतर निलंबनाच्या कारवाईसाठीचा प्रस्ताव
येथील तहसील कार्यालयाकडून वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार असल्याचे समजते.