श्रेयांश सावंत 80 गुणांनी देशातून दहावा
वेंगुर्ले : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्पर्धेत वेंगुर्ले येथील तेजस्वी अबॅकसच्या मुलांनी सुयश मिळविले आहे. येथील तेजस्वी अबॅकसच्या ५ मुलांनी तृतीय क्रमांक व ९ मुलांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. तर २९ मुले सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या स्पर्धेची दुसरी फेरी ही राष्ट्रीय स्तरावरील असून यामध्ये तेजस्वी अबॅकसर्फे दोन विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील शर्व आपटे या मुलाने ९२ गुण तर श्रेयांस सावंत या मुलाने ८० गुण मिळवत आपल्या गटात देशातून दहावा क्रमांक मिळवला.
प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील सहभागी झालेल्या आणि विजेते ठरलेल्या मुलांचा बक्षीस वितरण सोहळा तेजस्वी अबॅकस तर्फे साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला वेंगुर्ला येथील माजी नगरसेविका ॲड. सौ सुषमा प्रभूखानोलकर व पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथील शिक्षिका सौ. सविता जाधव आणि शिरोडा येथील प्रसिद्ध उद्योजक श्री पराग शिरोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : आराध्य उगवेकर, अस्मि कांबळी, श्रेयस सावंत, शर्व आपटे, वरदा परब सर्व तृतीय क्रमांक व आर्यन मोचेमाडकर, स्वरूप आरोलकर, वैष्णवी कर्पे, ओम केरकर, ऐश्वर्या परब, श्रावणी शिरोडकर, सान्वी तेंडुलकर, सर्वेश साळगावकर, यथार्थ सूर्याजी, आराध्य पोळजी, प्रांजल माडकर सर्व उत्तेजनार्थ. ठरले. सर्व विद्यार्थ्यांचे अबॅकस ते संचालक मनोज शारबिद्रे यांनी अभिनंदन केले आहे.