काळसेकर कुटुंबियांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन

Google search engine
Google search engine

 

मालवण | प्रतिनिधी : काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी काळसेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तात्पुरत्या स्वरूपात मदत देत अन्य स्वरूपात मदत मिळवून देण्याबाबत कुटुंबाला आश्वासीत केले.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजेंद्र परब, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, उपसरपंच अनिल सरमळकर, आबा हडकर, मंदार लुडबे, रमेश मयेकर, योगेश राऊळ, सुमित सावंत, मनोज काळसेकर, विजय काळसेकर, सचिन सावंत, प्रीतम चव्हाण, मोनिका म्हापणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.