वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले-बेळगाव मार्गावर आडेली गावामध्ये आज पहाटे कुडाळच्या दिशेने निघालेल्या एका काजूने भरलेल्या ट्रकवर अचानक एक मोठे वडाचे झाड कोसळले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक आणि त्यावर असलेल्या काजूचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात ट्रक चे नुकसान झाले आहे. तर काजूच्या गोण्या फाटल्याने अनेक काजू रस्त्यावर विखुरले गेले. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावरील झाड हटवण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.









